Tuesday 2 August 2022

हायकू

साहित्य शब्दगंध हायकू समुहातर्फे राज्यस्तरीय हायकू स्पर्धेसाठी

विषय- पंचतत्व शब्दगुंफण हायकू

शिर्षक- शब्दगुंफण

आधारस्तंभ
पृथ्वी सकल जीव
दिसे सजीव

जल प्रपात
कोसळे जलधारा
शितल वारा

जगण्या वायू
हालचाल सर्वत्र
संदेश पत्र

पेटता अग्नी
लवलवती ज्वाला
परमेशाला 

शुभ्र आकाश
धरती पांघरते
तृप्त दिसते

पंचतत्वांनी
वसुधा बहरते
मन मोहते

संवर्धनास
जन आसुसलेले
सुख पेलले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday 29 April 2017

जुनं ते सोनं

जुनं ते सोनं


चालताना पाय थकत नव्हते ,
आता चालणच नको झालय .
गावापासून लांब कॉलेज ,
मिळून चालत जात होतो .

सायकलची तर बातच सोडा ,
गाडीशिवाय चालतच नाही .
पूर्वी बोलत जात होतो ,
आता फोनच जादा बोलतो .

संवाद चाललाय हरवत ,
सोबत फक्त नावालाच असते .
शेजारी राहतय कोण याची ,
यात भ्रांतच कुणाला नसते .

पारकट्टा पूर्वीचा पडलाय ओस
तरुणपीढीची पहात वाट .
सायबर कँफेला भुललाय ,
पाहुन त्याचा रोज नविन थाट .

सणसमारंभ झालेतच गायब ,
सहकार्य करण्या कुणी येईना .
आठवण जुन्या काळाची ,
घरदारातील गर्दी हटता हटेना .

व्यायामाला नव्हती तोड ,
घोटीव शरीर पिळदार दंड .
आता एकएक अवयवांनी .
पुकारलाय मोठा बंड .

आता तरी शहाणे व्हा ,
जुनं ते सोनं ठेवा ध्यानी .
कीतीही आधुनिक झालो तरी ,
भूतकाळाला ठेऊया मनी .



श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,416106